Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
*डोळे या शब्दावरून*

*वाक्प्रचार, म्हणी व अर्थ*

१) डोळा लागणे - झोप लागणे

२) डोळा मारणे - इशारा करणे

३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे

४) डोळे येणे - नेत्रविकार होणे

५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे

६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे

७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे

८) डोळे खिळणे - एकटक पाहणे

९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे

१०) डोळे दिपणे - थक्क होणे

११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे

१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे

१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे

१४) डोळे भरून येणे - रडू येणे

१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे

१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे

१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे

१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे

१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे

२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे

२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे

२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे

२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे

२४) डोळ्यात सलणे/खुपणे - दुसऱ्याचं चांगलं न बघवणे

२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे

२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे

२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे

२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे

२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे

३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे.
@talathi_bharati_2023
👍12
🌸🌸अलंकारिक शब्द🌸🌸

🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

🌷 अकलेचा कांदा : मूर्ख

🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

🌷 अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात

🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा

🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू

🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस

🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा

🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस

🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस

🌷 कुपमंडूक : संकुचित वृत्तीचा

🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री

🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी

🌷 खडास्टक : भांडण

🌷 खुशालचंद : अतिशय चैनखोर

🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे

🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा

🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत

🌷 गंगा यमुना : अश्रू

🌷 गंडांतर : भीतीदायक संकट

🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 

🌷 गाढव : बेअकली माणूस

🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य

🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा

🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर

🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य

🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा

🌷 घोरपड : चिकाटी धरणारा

🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड

🌷 चालता काळ : वैभवाचा काळ

🌷चौदावे रत्न : मार

🌷 छत्तीसचा आकडा : शत्रूत्व

🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस

🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे

🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा

🌷 थंडा फराळ : उपवास

🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे

🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे

🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस

🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा

🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग

🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत

🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा

🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग

🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा

🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू

🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य

🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती

🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य

🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन

🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न

🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी

🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा

🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू

🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम

🌷 मृगजळ : केवळ आभास

🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य

🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल

🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार

🌷 वाहती गंगा : आलेली संधी

🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य

🌷 सिकंदर : भाग्यवान

🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब

🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य

🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे

🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य

🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य

🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य

🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम

🌷 सूर्यवंशी : उशिरा उठणारा

🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस

🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी 
     
@talathi_bharati_2023
👍192
ज्यांना असा मेल आला असेल त्यांनी त्यांचा फोटो अपडेट करा ✅️.
👍3
सर्वांना दुसऱ्याच्या नावाने मेल आले आहे घाबरू नका. Technical Problem असेल. पण सर्वांनी 2 फोटो अपलोड केले आहे का ते बघून घ्या. एक Live Capture Photo आणि एक अपलोडेड फोटो.
@talathi_bharati_2023
👍21
🛑 तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचं... काळजीपूर्वक वाचा🙏

👉ज्यांचा फॉर्म चुकला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, त्यांना पुन्हा त्याच जिल्ह्यात दुसरा फॉर्म भरता येईल .

👉(मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वेगळा वापरा, 10 विचा रोल नंबर तुमचा जो आहे तोच टाका).

⚠️ फक्त एकाच जिल्ह्यात असं करता येईल बरं 🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍2
🔸सर्वांनी Payment Status चेक करून घ्या. इथे Payment Succes च पाहिजे.

Payment Failure असेल तर तुमचे हॉल तिकीट येणार नाही
----------------------------------------------
@talathi_bharati_2023
👍4
तलाठी भरती वेबसाईट सध्या बंद आहे, लवकरच सुरु होईल
👍3
तलाठी वेबसाइट चालत आहे. ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनी करुन घ्या.

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

@talathi_bharati_2023
👍3🥰1😱1
🔰एक सूचना....

सध्या बऱ्याच भरती प्रक्रियेचे फॉर्म भरणे सुरू आहे. बरेच विद्यार्थी घाई गडबडीत चुकीचे फॉर्म भरून पुन्हा त्यात सुधारणा कशी करता येईल याबाबत विचारत आहेत.
त्यामुळे सर्वांनी कृपया काळजीपूर्वक फॉर्म भरणे आवश्यक आहे.

👉शक्यतो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चा वापर करा.
👉इंटरनेट कॅफे वाल्याला फॉर्म भरायला सांगू नका,स्वतः तिथे थांबून एक एक गोष्ट Final Submission च्या आधी स्वतः तपासा.
मागे काही जणांची Sign कॅफे वाल्याने अदलाबदल केली होती.
👉 Original कागदपत्रे समोर ठेऊन फॉर्म भरा. एकाने तलाठी चा फॉर्म भरताना 10th च्या seat no. च्या जागी 12th चा टाकून ठेवला.
👉 Fees खूप जास्त आहे ,पण माझा
सल्ला असेल की ज्यांना अजून कोणतीही पोस्ट मिळालेली नसेल अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक फॉर्म भरायलाच हवा. कधी कधी आपल्याला जिथे शक्यता वाटत नाही तिथेच बऱ्याच वेळा selection होते.

All the best👍
👍5
♦️ तलाठी परीक्षेच शुल्क भरताना पेमेंट Debit card, Credit 💳कार्ड अथवा Net Banking वरुन करा.. payment होत आहे..

👉 फोन पे, गुगल पे UPI वरून तलाठी भरती PAYMENT करणे टाळा.. प्रॉब्लेम येत आहे..🙏
Forwarded from Talathi bharti 2023
🔸सर्वांनी Payment Status चेक करून घ्या. इथे Payment Succes च पाहिजे.

Payment Failure असेल तर तुमचे हॉल तिकीट येणार नाही
----------------------------------------------
@talathi_bharati_2023
👍1
🔥तलाठी फॉर्म प्रॉब्लेम solve.

BE / BTECH वाले any graduate select करा .
आणि specific मध्ये तुमची Branch टाका  for eg. BE MECHANCAL.
अस केलं तर 100% होईल...
👍41
😱1
🛑तलाठी भरती - 2023 Capture Photo Upload करण्याबाबत..
👍5
👍1
♦️तलाठी भरती २०२३

अर्जांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून आज संध्याकाळी ६ वाजता संकेतस्थळ सूरू होईल.
🛑तलाठी भरती २०२३ ला अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे...🔥🔥✌️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
फक्त एकच दिवस वाढली आहे
👍3🥰2
✔️ देश व त्यांच्या दरम्यान असलेल्या सीमा

🔰 लाईन ऑफ कंट्रोल : भारत - पाकिस्तान
🔰 रेडक्लिफ रेषा : भारत - पाकिस्तान
🔰 लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल : भारत-चीन
🔰 मॅकमोहन रेषा : भारत - चीन
🔰 मेडिसीन : अमेरिका - कॅनडा
🔰 मॅगिनोट रेषा : जर्मनी - फ्रान्स
🔰 मॅनरहैम रेषा : रशिया - फिनलँड
🔰 ओडर-निइस : पोलंड - पूर्व जर्मनी
🔰 सीगफ्राइड : फ्रान्स - जर्मनी
🔰 हिंडेनबर्ग : पोलंड - जर्मनी
🔰 डुरंड : पाकिस्तान - अफगाणिस्तान ‌.
@talathi_bharati_2023
👍51🔥1
🎯 शास्त्रीय उपकरणे व वापर 🎯


स्टेथोस्कोप > हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
सेस्मोग्राफ >भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
फोटोमीटर >परकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
हायग्रोमीटर > हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
हायड्रोमीटर > द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
हायड्रोफोन > पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
अ‍ॅमीटर > विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
अल्टीमीटर > समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
अ‍ॅनिमोमीटर > वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
ऑडिओमीटर > ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
बॅरोमीटर > हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
बॅरोग्राफ > हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
मायक्रोस्कोप > सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
लॅक्टोमीटर > दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
स्फिग्मोमॅनोमीटर > रक्तदाब मोजण्याचे साधन.

@talathi_bharati_2023
👍3