Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
पहिल्या पेपरला minimum 45% म्हणजेच 120 पैकी 54 पडले पाहिजे तरच दुसरा पेपर चेक होईल. आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा minimum 45% म्हणजेच 80 पैकी 36 पडायला हवे.
दोन्ही पेपरला वेगवेगळे 45% मिळायला हवे तरच निवड यादी मध्ये घेतलं जाईल.
म्हणजे 200 पैकी 90 मार्क्स पडले पाहिजे.
त्यात 1/4 negative marking....
👍81👏1
Talathi bharti 2023
Photo
काही गोष्टी हायलाइट्स किंवा रेकॉर्डिंग पहायच्या नसतात. तर त्या लाईव्ह पहायच्या असतात.
जरूर वेळ काढा.
आज, शुक्रवार दि १४ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजुन ३४ मिनिटांनी इस्रोच्या "चांद्रयान_३" चे उड्डाण होणार आहे!...
आजची आपली कामे त्याप्रमाणे शेड्यूल करा, आणि एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा! 🙂🙂🙂🙂
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👍4
चांद्रयान 3 प्रक्षेपित
👍1
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून राज्यपाल #रमेश_बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.

🔸मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

🔸उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

🔸उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

🔸 छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

🔸 दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

🔸 राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

🔸 सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

🔸 हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

🔸 चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

🔸 विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

🔸 गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

🔸 गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

🔸 दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

🔸 संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

🔸 धनंजय पंडितराव मुंडे – कृषि

🔸 सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

🔸 संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

🔸 उदय रविंद्र सामंत- उद्योग

🔸 प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

🔸 रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

🔸 अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

🔸 दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

🔸 धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

🔸 अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

🔸 शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

🔸 कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

🔸 संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

🔸 मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

🔸 अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
👍7
ज्या उमेदवारांचा एकच फोटो घेऊन फॉर्म सबमिट झाला होता किंवा कॅप्चर फोटो अपलोड झाला नव्हता पण फॉर्म सबमिट झाला होता त्यांना दोन्हीही फोटो पुन्हा अपलोड करण्याची सुविधा दिली आहे

आपल्या खात्यात लॉग इन करून फोटो अपलोड पर्याय निवडून नवीन फोटो अपलोड करा
@talathi_bharati_2023
👍4
राहिलेल्यांनी फॉर्म आजच भरून घ्या शेवटच्या दिवशी website वर लोड येतो
@talathi_bharati_2023
*डोळे या शब्दावरून*

*वाक्प्रचार, म्हणी व अर्थ*

१) डोळा लागणे - झोप लागणे

२) डोळा मारणे - इशारा करणे

३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे

४) डोळे येणे - नेत्रविकार होणे

५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे

६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे

७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे

८) डोळे खिळणे - एकटक पाहणे

९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे

१०) डोळे दिपणे - थक्क होणे

११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे

१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे

१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे

१४) डोळे भरून येणे - रडू येणे

१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे

१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे

१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे

१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे

१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे

२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे

२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे

२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे

२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे

२४) डोळ्यात सलणे/खुपणे - दुसऱ्याचं चांगलं न बघवणे

२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे

२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे

२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे

२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे

२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे

३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे.
@talathi_bharati_2023
👍12
🌸🌸अलंकारिक शब्द🌸🌸

🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

🌷 अकलेचा कांदा : मूर्ख

🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

🌷 अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात

🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा

🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू

🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस

🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा

🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस

🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस

🌷 कुपमंडूक : संकुचित वृत्तीचा

🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री

🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी

🌷 खडास्टक : भांडण

🌷 खुशालचंद : अतिशय चैनखोर

🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे

🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा

🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत

🌷 गंगा यमुना : अश्रू

🌷 गंडांतर : भीतीदायक संकट

🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 

🌷 गाढव : बेअकली माणूस

🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य

🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा

🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर

🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य

🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा

🌷 घोरपड : चिकाटी धरणारा

🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड

🌷 चालता काळ : वैभवाचा काळ

🌷चौदावे रत्न : मार

🌷 छत्तीसचा आकडा : शत्रूत्व

🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस

🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे

🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा

🌷 थंडा फराळ : उपवास

🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे

🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे

🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस

🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा

🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग

🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत

🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा

🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग

🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा

🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू

🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य

🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती

🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य

🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन

🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न

🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी

🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा

🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू

🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम

🌷 मृगजळ : केवळ आभास

🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य

🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल

🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार

🌷 वाहती गंगा : आलेली संधी

🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य

🌷 सिकंदर : भाग्यवान

🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब

🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य

🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे

🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य

🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य

🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य

🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम

🌷 सूर्यवंशी : उशिरा उठणारा

🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस

🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी 
     
@talathi_bharati_2023
👍192
ज्यांना असा मेल आला असेल त्यांनी त्यांचा फोटो अपडेट करा ✅️.
👍3
सर्वांना दुसऱ्याच्या नावाने मेल आले आहे घाबरू नका. Technical Problem असेल. पण सर्वांनी 2 फोटो अपलोड केले आहे का ते बघून घ्या. एक Live Capture Photo आणि एक अपलोडेड फोटो.
@talathi_bharati_2023
👍21
🛑 तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचं... काळजीपूर्वक वाचा🙏

👉ज्यांचा फॉर्म चुकला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, त्यांना पुन्हा त्याच जिल्ह्यात दुसरा फॉर्म भरता येईल .

👉(मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वेगळा वापरा, 10 विचा रोल नंबर तुमचा जो आहे तोच टाका).

⚠️ फक्त एकाच जिल्ह्यात असं करता येईल बरं 🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍2
🔸सर्वांनी Payment Status चेक करून घ्या. इथे Payment Succes च पाहिजे.

Payment Failure असेल तर तुमचे हॉल तिकीट येणार नाही
----------------------------------------------
@talathi_bharati_2023
👍4
तलाठी भरती वेबसाईट सध्या बंद आहे, लवकरच सुरु होईल
👍3
तलाठी वेबसाइट चालत आहे. ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनी करुन घ्या.

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

@talathi_bharati_2023
👍3🥰1😱1
🔰एक सूचना....

सध्या बऱ्याच भरती प्रक्रियेचे फॉर्म भरणे सुरू आहे. बरेच विद्यार्थी घाई गडबडीत चुकीचे फॉर्म भरून पुन्हा त्यात सुधारणा कशी करता येईल याबाबत विचारत आहेत.
त्यामुळे सर्वांनी कृपया काळजीपूर्वक फॉर्म भरणे आवश्यक आहे.

👉शक्यतो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चा वापर करा.
👉इंटरनेट कॅफे वाल्याला फॉर्म भरायला सांगू नका,स्वतः तिथे थांबून एक एक गोष्ट Final Submission च्या आधी स्वतः तपासा.
मागे काही जणांची Sign कॅफे वाल्याने अदलाबदल केली होती.
👉 Original कागदपत्रे समोर ठेऊन फॉर्म भरा. एकाने तलाठी चा फॉर्म भरताना 10th च्या seat no. च्या जागी 12th चा टाकून ठेवला.
👉 Fees खूप जास्त आहे ,पण माझा
सल्ला असेल की ज्यांना अजून कोणतीही पोस्ट मिळालेली नसेल अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक फॉर्म भरायलाच हवा. कधी कधी आपल्याला जिथे शक्यता वाटत नाही तिथेच बऱ्याच वेळा selection होते.

All the best👍
👍5
♦️ तलाठी परीक्षेच शुल्क भरताना पेमेंट Debit card, Credit 💳कार्ड अथवा Net Banking वरुन करा.. payment होत आहे..

👉 फोन पे, गुगल पे UPI वरून तलाठी भरती PAYMENT करणे टाळा.. प्रॉब्लेम येत आहे..🙏
Forwarded from Talathi bharti 2023
🔸सर्वांनी Payment Status चेक करून घ्या. इथे Payment Succes च पाहिजे.

Payment Failure असेल तर तुमचे हॉल तिकीट येणार नाही
----------------------------------------------
@talathi_bharati_2023
👍1
🔥तलाठी फॉर्म प्रॉब्लेम solve.

BE / BTECH वाले any graduate select करा .
आणि specific मध्ये तुमची Branch टाका  for eg. BE MECHANCAL.
अस केलं तर 100% होईल...
👍41
😱1