Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
जाहिरात आली 🔥

👉 फक्त राज्यसेवा 295 जागा🙏

👉Total_673 जागा🙏
@talathi_bharati_2023
👍1
⭕️♦️⚠️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहिरात

👉अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिनांक 2 मार्च पासून सुरू होईल...

👉Last date of Application: 22 March 2023

@talathi_bharati_2023
👍2
भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

🔰1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44
- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य बेप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)

🔰2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27
- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)

🔰3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48
- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)

🔰4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52
- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)

🔰5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30
- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)

🔰6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06
- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)

🔰7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53
- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)

🔰8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16
- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)

🔰9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66
- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)

🔰10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19
- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)


@talathi_bharati_2023
👍3
महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :
जलाशय/नदी स्थळ/जिल्हा
●जायकवाडी – नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
●भंडारदरा – (प्रवरा) अहमदनगर
●गंगापूर – (गोदावरी) नाशिक
●राधानगरी – (भोगावती) कोल्हापूर
●कोयना शिवाजी सागर – (कोयना) ●हेळवाक (सातारा)
●उजनी – (भीमा) सोलापूर
●तोतलाडोह – मेघदूत जलाशय ●यशवंत धरण – (बोर) वर्धा
●मोडकसागर – (वैतरणा) ठाणे
●खडकवासला – (मुठा) पुणे
●येलदरी – (पूर्णा) परभणी
●बाभळी प्रकल्प – (गोदावरी) नांदेड
@talathi_bharati_2023
👍2
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.

🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
• MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
💞👌👌👌👌👌👌👌👌👌
@talathi_bharati_2023
👍2
संयुक्त गट ब पूर्व‌ परीक्षा २०२२
• बहुपर्यायी 21
• वन लायनर - 58🔥
• जोड्या लावा - 6

संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०२२
• बहुपर्यायी 23
• वन लायनर - 57🔥
• जोड्या लावा - 5

📌समझने वालो को इशारा काफी है

30 एप्रिल 🔥🔥
----------------------------------------

@talathi_bharati_2023
👍3😁2
लेखापाल_सरळसेवा_भरती_2023_Draft_Advt.pdf
6.7 MB
⭕️♦️⚠️वन विभागातील लेखापाल (गट क) भरती प्रक्रिया सन २०२३ जाहिरात मसुदा..🌿🌳🌳
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
15 वा वित्त आयोग
स्थापना :- 27 नोव्हेंबर 2017
मंत्रालय :- डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, वित्त मंत्रालय
अध्यक्ष :- एन. के. सिंग
पूर्णवेळ सदस्य :- अजय झा, अनुप सिंग, अशोक लाहिरी
अर्धवेळ सदस्य :- रमेश चंद
सचिव :- अरविंद मेहता
अहवाल :- 2 (2020-2021 आणि 2021-2026)


प्रमुख शिफारसी :-
1)
आयोगाने शिफारशीप्रमाणे केंद्रीय कराच्या निव्वळ उत्पन्नापैकी 41% रक्कम सध्याच्या 42% च्या तुलनेत राज्यांना वाटली पाहिजे. आयोगाप्रमाणे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या नव्याने स्थापन झालेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे केंद्रीय कराच्या निव्वळ उत्पन्नाच्या 1% प्रमाणे आर्थिक संसाधने राखून ठेवली पाहिजेत.

2) महसुली तूट अनुदानासाठी पात्र ठरलेल्या राज्यांची संख्या पहिल्या वर्षी 17 असेल तर शेवटच्या वर्षात 6 असणार आहे.

3) आयोगाने आरोग्य, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी, PMGSY रस्त्यांची देखभाल, महत्त्वाकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक, न्यायव्यवस्था, आकडेवारी अशा आठ वेगवेगळ्या क्षेत्रात राज्य सरकारांना अनुदान देण्याची शिफारस केली आहे.


4) आयोगाने शिफारस केली आहे की राज्य सरकारांच्या निव्वळ कर्जाची सामान्य मर्यादा 2021-22 मध्ये GSDP च्या 4 टक्के, 2022-23 मध्ये 3.5 टक्के आणि 2023-24 ते 2025 पर्यंत GSDP च्या 3 टक्के राखली जावी.


5) आयोगाने शिफारस केली आहे की एफआरबीएम कायद्याची एक मोठी पुनर्रचना आवश्यक आहे आणि कर्जाची शाश्वतता परिभाषित करण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी वेळापत्रकाची शिफारस केली आहे.
@talathi_bharati_2023
👍5
   पंचवार्षिक योजना 

  पहीली पंचवार्षिक योजना
--कालावधी-०१ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६
अध्यक्ष-पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष-गुलझारीलाल नंदा
प्रतिमान-हेरोल्द डोमर
उपनाव-पुनरुत्थान

  दुसरी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१
अध्यक्ष-पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष-महालनोबीस/व्ही.टी कृष्णामाचारी
प्रतिमान- महालनोबीस
उपनाव- नेहरू-महालनोबीस भौतिकवादी

  तिसरी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६
अध्यक्ष-पंडित जवाहरलाल नेहरू(६१-६४) लाल बहादूर शास्त्री(६४-६६)
उपाध्यक्ष-व्ही.टी कृष्णामाचारी
प्रतिमान- महालनोबीस

💥 तीन सरकत्या योजना

--पहिली वार्षिक योजना(१ एप्रिल ६६ – ३१ मार्च ६७)
दुसरी वार्षिक योजना योजना(१ एप्रिल ६७ – ३१ मार्च ६८)
तिसरी वार्षिक योजना योजना(१ एप्रिल ६८ – ३१ मार्च ६९)

  चौथी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष- श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष- अशोक मेहता
प्रतिमान- अलन रुद्र

  पाचवी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८
अध्यक्ष- श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष- धनंजय गाडगीळ
प्रतिमान- अलन रुद्र

  सहावी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५
अध्यक्ष- श्रीमती इंदिरा गांधी/राजीव गांधी
उपाध्यक्ष- डी.पी.धर
प्रतिमान- अलन रुद्र

  सातवी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०
अध्यक्ष- राजीव गांधी
उपाध्यक्ष- मनमोहन सिंग
प्रतिमान- वकील ब्रह्मानंद(मजुरी-वस्तू)

वार्षिक योजना (१९९० - १९९२)

--१ jully १९९१ रुपयाचे अवमूल्यन भाव वाढ
२४ jully १९९१ चे नवीन आर्थिक धोरण
१९९०-९३ तिसरे आयात निर्यात धोरण

  आठवी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७
अध्यक्ष- पी व्ही नरसीह राव
उपाध्यक्ष- प्रणव मुखर्जी
प्रतिमान- राव /डॉ मनमोहन सिंग

  नववी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
अध्यक्ष- देवेगौडा / अट्टल बिहारी वाजपेयी
उपाध्यक्ष- जसवंतसिंग / के.सी.पंत
प्रतिमान- गांधीवादी

  दहावी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
अध्यक्ष- अट्टल बिहारी वाजपेयी
उपाध्यक्ष- के.सी.पंत
प्रतिमान- गांधीवादी
घोषवाक्य- समानता व सामजिक न्याय

  अकरावी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
अध्यक्ष- डॉ.मनमोहन सिंग
उपाध्यक्ष- मोन्तेग सिंग अहलुवालिया
प्रतिमान- नवे गांधीवादी
घोषवाक्य- वेगवान व सर्वसमावेशक विकास

  १२ वी पंचवार्षिक योजना

--कालावधी-०१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७
अध्यक्ष- डॉ.मनमोहन सिंग
उपाध्यक्ष- मोन्तेग सिंग अहलुवालिया
प्रतिमान- नवे गांधीवादी
घोषवाक्य- वेगवान शाश्वत व सर्वसमावेशक वृद्धी

@talathi_bharati_2023
👍1
🟢आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...

🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→   १४०० ग्रॅम.
🔶 सामान्य रक्तदाब ?
→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→   न्यूरॉन.

🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→   ५ ते ६ लीटर.
 
🔶सर्वात लहान हाड ?
→   स्टेटस ( कानाचे हाड )

🔶 सर्वात मोठे हाड ?
→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   १२० दिवस.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   २ ते ५ दिवस.

🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→   ७२ प्रतिमिनिट.

🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→   थायरॉईड ग्रंथी.

🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→   ग्लुटियस म्याक्सीमस.

🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→   ६३९.

🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→   मोनोसाईटस - ३ ते ८%.
→   बेसोफिल्स - ०.५%.
→   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.


🔶शरीराचे तापमान ?
→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

🔶प्रौढांमधील दातांची संख्या ?
→   ३२.

🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→   २० दूधाचे दात.

🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→   पापणी (कंजक्टायव्हा)
@talathi_bharati_2023
👍11
परवा शाळेत गेल्यावर पाचवीच्या वर्गातली एक मुलगी जवळ येवून म्हणाली,’’ सर, मला पण बाबा नाहीत मी पण तुमच्यासारखं साहेब होणार’’
माझ्या डोळ्यांत झटकन पाणी आलं, मी निशब्द झालो…

परत येताना दिनू म्हटला, यासाठीच आम्हाला मिरवणूक काढायची होती. गावातल्या ४ अनाथांना जरी बळ मिळालं तरी आमच्या खटाटोपाचं सार्थक हेईल…

तसं साहेब तर मागच्या वर्षीच झालो होतो,
पण ज्या गावाने वडिलांची प्रेतयात्रा पाहीली त्याच गावात परवा माझी मिरवणूक निघाली…
आई सोबत जीप मध्ये उभा होतो त्यावेळी १३ वर्षापूर्वीचा तो दिवस डोळ्यासमोर उभा राहीला, त्यावेळी पण गर्दी होती आणि आज पण गर्दीच आहे पण ती गर्दी अश्रू पुसण्यासाठी आली होती तर आजची गर्दी त्या माऊलीचे आनंदाश्रू पाहण्यासाठी जमली होती.

आजही तिचं ओसाड कपाळ पाहीलं की एक वेगळंच बळ अंगात संचारतं. वडिल गेले तेव्हा ती अगदीच कोसळली होती, तिची दातखिळ बसली होती, तिचे विस्कटलेल्ले केस, अर्ध प्सलेलं कुंकु आणि तिला सावरणारी माझी मेठी बहीण, ते चित्र आठवलं की आजही काळजीत चिर्रर होतं.

एका विधवेचं आयुष्य मी अनुभवलंय,

अंगठ्याला धारधार दगडाची ठेच लागून भळभळ रक्त आल्यावर ज्या वेदना होतात तशाच वेदना मला व्हायच्या, जेव्हा कोणत्याही ठिकाणी आईच्या नावापुढे सौभ्याग्यती च्या ऐवजी श्रीमती लिहावं लागायचं....
संक्रांतीला सगळा गाव विठ्ठल रूक्मिणीच्या मंदीरात जमायचा आणि ती माऊली ऊसाला पाणी द्यायची.
प्रत्येक सत्कारात माझ्या कपाळी लावलेला कुंकव हा माझ्या आयुष्याची शत्रू बनला होता. घरी आलेल्या पाहुणीला कुंकु लावायला पण शेजारून कोणाला तरी ती बालवून आणीयची.
कित्येकदा लक्ष्मीचं पुजन न करता तिनं त्या ट्रंकात परत ठेवल्यात....

माझ्या वडीलांच्या चितेचा विस्तव जरी विझलेला असला तरी ती धग आणि आग आजही माझ्या काळजात आहे.

या आगीतून महाराष्ट्रात लाखो मशाली पेटो हीच अपेक्षा ....

केदार बारबोले
राज्यात ६ वा (MPSC 2021)
https://t.me/samwad_for_mpsc
@talathi_bharati_2023
👍8🔥1
👸 8 मार्च जागतिक महिला दिन विशेष पहिल्या महिला 👸
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔆 पहिली महिला राष्ट्रपती -  प्रतिभाताई पाटील
🔆 पहिली महिला पंतप्रधान -  इंदिरा गांधी
🔆 पहिली महिला राज्यपाल -  सरोजिनी नायडू
🔆 पहिली महिला राज्यपाल -  विजयालक्ष्मी पंडित (MH)
🔅 पहिली महिला मुख्यमंत्री -  सुचेता कृपलानी
🔅 पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती -  द्रौपदी मुर्म
🔅 पहिली महिला लोकसभा सभापती -  मीरा कुमार
🔅 भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला -  इंदिरा गांधी
🔅 नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला -  मदर तेरेसा
🔅 पहिली महिला मुख्यमंत्री न्यायाधीश -  लीला सेठ
🔅 पहिली महिला निवडणूक आयुक्त -  व्ही. एस. रमादेवी
🔅 सर्वोच्च न्यायालयातील पहिली न्यायाधीश -  फातिमा बीबी
🔅 रा काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण देणाऱ्या -  कादंबिनी गांगुली
🔅 भारताच्या पहिल्या महिला पदवीधर -  कादंबिनी गांगुली
🔅 भारताची पहिली महिला शिक्षिका -  सावित्रीबाई फुले
🔅 भारताची पहिली महिला डॉक्टर -  आनंदीबाई जोशी
🔅 भारताची पहिली महिला आयपीएस -  किरण बेदी
🔅 भारताची पहिली महिला आयएएस -  अन्ना राजन जॉर्ज
🔅 संयुक्त राष्ट्रसंघ महासभा महिला अध्यक्ष -  विजयालक्ष्मी पंडित
🔅 भारताची पहिली महिला लोको पायलट -  सुरेखा यादव
🔅 मनोरेल चालक पहिली महिला -  जुईली भंडारे
🔅 मुंबई बेस्ट ची पहिली महिला चालक -  लक्ष्मी जाधव
🔅 पहिली महिला मिस युनिव्हर्स -  सुश्मिता सेन
🔅 पहीली महिला मिस वर्ल्ड -  रिटा फारीया
🔅 पहिली महिला मिस अर्थ - निकोल फारिया
🔅 पहिली महिला मिस इंडिया -  एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम
🔅 ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला -  आशापूर्ण देवी
🔅 दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती अभिनेत्री -  देविका राणी
🔅 साहित्य अकादमी पुरस्कार विजेती -  अमृता प्रीतम
🔅 एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला -  बचेंद्री पाल
🔅 एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला -  अरुणिमा सिन्हा
🔅 इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला -  आरती सहा
🔅 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष -  एनी बेझंट
🔅 रा. सभेचे पहिली भारतीय महिला अध्यक्ष -  सरोजिनी नायडू
🔅 भारताची पहिली महिला राजदूत -  सी. बी. मुथम्मा
🔅 पहिली केंद्रीय कॅबिनेट मंत्री -  राजकुमारी अमृता कौर
🔅 पहिली पूर्ण वेळ महिला परराष्ट्रमंत्री -  सुषमा स्वराज
🔅 पहिली महिला फायटर पायलट -  अवनी चतुर्वेदी
🔅 पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट -  अभिलाषा बराक
🔅 भारतीय नौ सेनेची पहिली महिला पहिला -  शुभांगी स्वरूपा
🔅 जम्मू-काश्मीरमधील पहिली फ्लाईंग ऑफिसर - माव्या सुदान
🔅 पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती -  रझिया सुलतान
🔅 पहिली महिला रुग्णवाहिका चालक -  विषया लोणारे
🔅 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष -  जयंती पटनायक
🔅 भारतीय वंशाची पहिली अंतरिक्ष यात्री -  कल्पना चावला
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
@talathi_bharati_2023
👍3
तलाठी भरती अपडेट
तलाठी भरती अपडेट
👍1
आज तलाठी भरतीचे श्राद्ध घालूयात...

तलाठी भरती होणार म्हणुन या शासनाने मोठा गाजावाजा करत मोठा इव्हेंट केला होता.. म्हणे 4 हजार तलाठी भरती होणार.. बेरोजगार पण खुश.. या शासनाचे धोरण मी चांगलाच ओळखून आहे.. हे 75000 हजार पदाचे खोटे आश्वासन दिले आहे.. नोकर भरती हा बेरोजगार तरुणांना दिलेला लॉलीपॉप दिला आहे.. नोकर भरतीचे GR वर GR काढले जात आहेत.. एक-एक विभागाचे पुन्हा-पुन्हा तेच तेच थोडा फार बदल करून GR काढायचे काम चालू आहे.. जाहिरात येण्याची कृती मात्र zero.. या सरकार मध्ये असलेल्या पक्षांना पदवीधर आमदार व शिक्षक आमदार तसेच कसबा (पुणे) मतदार संघात सुशिक्षित मतदारांनी जसे मतदान न करता धडा शिकवला तरी यातून हे काहीच शिकायला तयार नाहीत.. आता या सरकारने नोकर भरती ओउटसर्सिंग कंपन्या द्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्याची तयारी सुरु केली आहे.. सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हे सरकार काम करत तर नाही ना.. सुशिक्षित बेरोजगार तरुण जागा झाला तर एक क्रांती घडते हे दाखवण्याची वेळ आली आहे.. शासनाने 75000 हजार पदाच्या जाहिराती न काढल्याने.. तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या विरोधी धोरणमुळे या सरकार विरोधात बेरोजगार सुशिक्षित तरुणामध्ये प्रचंड असंतोष,चिड निर्माण झाली आहे.. हा असंतोष उफाळून येण्यास वेळ लागणार नाही.. हे सुशिक्षित बेरोजगार तरुण जर आंदोलनासाठी रस्ता वर उतरले तर एक नवि क्रांती घडेल हे मात्र नक्की.. आणि आता रस्तावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी मोठा गाजावाजा करत 15 मार्च पर्यत तलाठी जाहिरात येईल अशी घेषणा केली होती मात्र ती घोषणा ही पोकळ ठरली.. आज या खोट्या आश्वासनाचे श्राद्ध म्हणुन मी बेरोजगार जाहीर निषेध व्यक्त करतो..

-एक बेरोजगार सुशिक्षित तरुण,नाशिक
@talathi_bharati_2023
👍27
Support बद्दल सर्वांचे आभार🙏🙏🙏
👍9
👍1