Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
🎯 महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान 🎯


* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६ .
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी
@talathi_bharati_2023
👍21🥰3👏1
🎯 जनक 🎯

👉आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
👉आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
👉भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
👉भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
👉भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
👉भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
👉मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
👉भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
👉भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
👉आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
👉आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
👉स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
👉भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
👉भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
👉भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
👉भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
👉भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

@talathi_bharati_2023
👍3
तलाठी फॉर्म ची date संपलेली आहे payment राहिलेले 20 तारखेपर्यंत करू शकता आता अभ्यास जोरात करा ......
✌️✌️🔥🔥अभी नही तो कभी नही🔥🔥✌️✌️
@talathi_bharati_2023
👍3
🎯 भारतीय जनगणना 2011 🎯

एकूण 15 वी व स्वातंत्रोत्तर 7 वी जनगणना दोन टप्प्यात पार पडली.

घरसूची आणि गृहंनिर्माण गणना --> (एप्रिल - सप्टेंबर 2010)

लोकसंख्या गणना ---> (9th - 28th फेब्रुवारी)

👉 घोषवाक्य --- आपली जनगणना, आपल भविष्य (Our Census, Our Future)
👉 एकूण खर्च -- 22 अब्ज रुपये, प्रती माणसी फक्त 0.5 डॉलर खर्च आला जे की जागतिक सरासरी प्रती माणसी 4.6 डॉलर आहे.
👉 भारतात एकूण 438 स्थानिक भाषा बोलल्या जातात.
👉 भारताचे एकूण क्षेत्रफळ -----> 32,87,590 चौकिमी,  2.4 % क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी
👉 भारताची एकूण लोकसंख्या ------> 1,21,01,90,000 (121 कोटी)
👉 महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ------> 11,23,72,972(11.23 कोटी)
👉 जगाच्या एकूण लोकसंख्या पैकी 17.5 % लोकसंख्या भारतात राहते.
👉 10 भारतीयांपैकी प्रत्येक 5 भारतीय उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या सहा राज्यात राहतात.
👉 ग्रामीण लोकसंख्या (Rural Population) - 68.84 % (72.19 % 2001)
👉 शहरी लोकसंख्या (Urban Population) - 31.16 % (27.81 % 2001)
👉 सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे राज्य
👉 राजस्थान ----- > 3,42,289 चौकिमी
👉 मध्यप्रदेश -----> 3,08,245 चौकिमी
👉 महाराष्ट्र  ------> 3,07,713 चौकिमी
👉 उत्तर प्रदेश  -----> 2,40,928 चौकिमी
👉 सर्वात कमी क्षेत्रफळ राज्य
👉 गोवा -----> 3,702 चौकिमी
👉 सिक्कीम -----> 7,096 चौकिमी
👉 त्रिपुरा -----> 10,486 चौकिमी
@talathi_bharati_2023
👍1🥰1
🎯 भारतीय जनगणना 2011 🎯
👉 सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे केंद्रशासित प्रदेश
👉 अंदमान आणि निकोबार -----> 8,249 चौकिमी
👉 दिल्ली ------> 1,483 चौकिमी
सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे केंद्रशासित प्रदेश
👉 लक्षद्वीप बेट -----> 37 चौकिमी
👉 दमन आणि दिव ------> 112 चौकिमी
👉 चंडीगड ------> 114 चौकिमी

👉 सर्वात जास्त ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या असलेले राज्य   
👉 हिमाचल प्रदेश ------> 89.96 %
👉 बिहार  ------> 88.70 %
👉 महाराष्ट्र -----> 54.77 %

👉 सर्वात जास्त शहरी भागात राहणारी लोकसंख्या असलेले राज्य
👉 गोवा -----> 62.17 %
👉 मिझोरम -----> 51.51 %

👉भारत ------> 943 प्रौढ (933 - 2001 census), बाल लिंग गुणोत्तर --> 919 (927 - 2001 census)
👉 सर्वात जास्त लिंगगुणोत्तर असलेले राज्य 
👉 केरळ -----> 1084
👉 तामिळनाडू -----> 995
👉 महाराष्ट्र ------> 925( 922 - 2001 census)
👉 सर्वात जास्त लिंगगुणोत्तरामध्ये वाढ झालेले राज्य
👉 मिझोरम ---> +37  ---- 975 (2011)-938 (2001)
👉 आसाम -----> +22 ---- 954(2011) - 932(2001)
👉 नागालँड -----> +22  ----  931(2011) - 909(2001)
👉 सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य
👉 हरयाणा ----> 877 (861 -- 2001 census)
👉 जम्मू आणि काश्मीर ---> 883 (874 - 2001 census)
👉 सिक्कीम ---> 889 (875 - 2001 census)
@talathi_bharati_2023
👍6
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तलाठी साठी 11.5 लाख अर्ज 🔥😱

अर्जाची संख्या जास्त असल्याने 20 दिवस चालणार परीक्षा
अर्जाची छाननी झाल्यावर परीक्षेच्या तारखा जाहीर होतील
@talathi_bharati_2023
😱4👍2
🎯 महाराष्ट्र - जलाशय व धरणे 🎯

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
@talathi_bharati_2023
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्र्यांना आणखीन एकदा तारीख वाढवण्याची विनंती केली आहे🙏
तारीख वाढवून येऊ शकते
समाजसुधारक भाग 1

🎯 लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920) 🎯

👉 जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी

👉 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे

👉 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना

👉 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

👉 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ

👉 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.

👉 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.

👉 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका

👉 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.

👉 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.

👉 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.

अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍5😱1
समाजसुधारक भाग 2

🎯 म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948) 🎯

👉 जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)

👉 इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.

👉 1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये

👉 गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.

👉 गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.

👉 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.

👉 पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.

👉 1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)

👉 1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)

👉 1918 - अहमदाबाद गिरणीतील संप

👉 1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.

👉 1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष

👉 1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ

👉 1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.

👉 1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.

👉 1940 - वैयक्तिक सत्याग्रह

👉 1942 - 'चलेजाव' ची घोषणा

👉 1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या

👉 दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.

अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍2
1🔥1
5_6109279979978099422.pdf
176.7 KB
⭕️♦️सरळसेवेसाठी अत्यंत महत्वाचे..

गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाची सुत्रे.

👉 स्टेट बोर्ड, Scholarship आणि इतर महत्वाच्या Source मधून गणित बुद्धिमत्तेची महत्वाची सूत्रे एकत्र केलेली आहेत.

👉 येणाऱ्या सर्व सरळसेवा आणि Combine साठी गणित आणि बुद्धिमत्ता साठी या pdf चा नक्की वापर करा..
TheAchieversMentorship
@talathi_bharati_2023
👍1
Talathi bharti 2023
TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
कोणतीही test series लावण्याच्या आधी हे question solve करा त्यापेक्षा जास्तच फायद्याचे ठरेल
@talathi_bharati_2023
🤣2👍1🥰1
तलाठी पदभरतीसंबंधी कोणत्याही माहितीसाठी पहिल्या ईमेल आयडी वर संपर्क करावा तसेच चुकीने शुल्क कट झाले असल्यास किंवा पेमेंट/रीफंड संबंधी कोणत्याही तक्रारीसाठी आपल्या अर्जा आणि पेमेंट स्लीप सहित तक्रार लिहून पाठविल्यास आपले रीफंड प्राप्त होऊ शकेल.
mpscguidnce
@talathi_bharati_2023
👍1
समाजसुधारक भाग 3

🎯 महात्मा जोतिबा फुले यांची कामगिरी 🎯

👉 मूळ गाव - कटगुण (सातारा)
👉  गोर्हे हे मूळ आडनाव.
👉 ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव
👉 आईचे नाव चिमणाबाई होते.
👉 सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
👉 सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत.
👉 स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
👉 १८२८ - जन्म कटगूण,सातारा जिल्हा
👉 १८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
👉 १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
👉 १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
👉 १८४७ - लहूजी बुवांकडेदांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
👉 १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
👉 १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
👉 १८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
👉 सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
👉 १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
👉 मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
👉 नोहेंबर १६ १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
👉 १८५३ - 'दि सोसायटी फॉरप्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग न्ड अदर्स' स्थापन केली.
👉 १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
👉 १८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
👉 १८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
👉 १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
👉 १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
👉 १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
👉 १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
👉 १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
👉 १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
👉 १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
👉 १८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
👉 १८७५ - स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
👉 १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
👉 १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
👉 १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
👉 १८८७ - सत्यशोधक समाजातफ नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली
👉 १८८८ - ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
👉 १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात  आली.
👉 २८नोव्हेंबर १८९र्० पुणे येथे निधन झाले.

👉 ज्योतीरावांची ग्रंथसंपदा -
👉 नाव साहित्यप्रकार लेखन काळ
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा  फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
१८८०- नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍10
📰 भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक (भाग-१)

🔰 दर्पण : बाळशास्त्री जांभेकर
🔰 दिग्दर्शन (मासिक) : बाळशास्त्री जांभेकर
🔰 प्रभाकर (साप्ताहिक) : भाऊ महाराज
🔰 हितेच्छू (साप्ताहिक) : लोकहितवादी
🔰 काळ (साप्ताहिक) : शी.म.परांजपे
🔰 स्वराज्य पत्र (साप्ताहिक) शी.म.परांजपे
🔰 केसरी : लोकमान्य टिळक
🔰 मराठा (इंग्रजी साप्ताहिक) : लोकमान्य टिळक
🔰 दिंनबंधू (साप्ताहिक) : कृष्णाराव भालेकर
🔰 समाज स्वास्थ (मासिक) : रघुनाथ धोंडो कर्वे
🔰 विध्यर्थी (मासिक) : साने गुरुजी
🔰 कॉग्रेस (साप्ताहिक) : साने गुरुजी
🔰 साधना (साप्ताहिक) : साने गुरुजी
🔰 शालापत्रक : कृष्णशास्त्री चिपळूणकर
🔰 उपासना (साप्ताहिक) : वी.रा.शिंदे
🔰 सुबोध पत्रिका : प्रार्थना समाज
🔰 महाराष्ट्र धर्म (मासिक) : आचार्य विनोबा भावे
🔰 मानवी समता : महर्षी धो. के. कर्वे
🔰 सुधारक (साप्ताहिक) : आगरकर
🔰 बहिष्कृत भारत (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब
🔰 मूकनायक (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब
🔰 जनता (प्रबुध्द भारत) : डॉ. बाबासाहेब
🔰 समता : डॉ. बाबासाहेब
🔰 मानवता: डॉ. बाबासाहेब
🔰 बहिष्कृत मेळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 सार्वजनिक सभा : न्या. म गो रानडे
🔰 इंदुप्रकाश : म गो रानडे
🔰 हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) : लाला हरदयाळ
🔰 श्रद्धा (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 विजय (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 अर्जुन (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 सदधर्म प्रचार (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 वंदे मातरम : अरविंद घोष

🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍6
महाज्योती upsc परीक्षा पुन्हा होणार🔥
@talathi_bharati_2023
👍3
♦️तलाठी अर्ज साठी २५ जुलै पर्यंत मुदतवाढ..
@talathi_bharati_2023
😱2🫡2👍1
♦️सहकार जाहिरात ला पण मुदतवाढ..

24 जुलै पर्यंत भरता येणार फॉर्म..
👍2